आदित्य ठाकरे उद्या बिहारच्या दौ-यावर, तेजस्वी यादव यांची भेट घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते,युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आज बिहारच्या दौ-यावर जात असून,या दौ-यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत.या दौ-यात त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी या दौ-यात सहभागी होणार आहेत.

शिवसेनेची फाटाफुट झाल्यानंतर शिवसेनेने नवे समीकरणे जुळवण्यास सुरूवात केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भिमशक्ती आणि शिवशक्ती युतीचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आता देशपातळीवरील नेत्यांशी जवळीक करण्यास सुरूवात केली आहे.त्यांचाच एक भाग म्हणून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आज बिहारच्या दौ-यावर जात असून,या दौ-यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत.आज बुधवारी ते बिहारच्या दौ-यावर जात आहेत.त्यांचासोबत खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी असतील.

Previous articleकाँग्रेस विसर्जित करण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकारले
Next articleशिंदे- फडणवीस सरकारबद्दल शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी : अजित पवारांचा हल्लाबोल