आदित्य यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा ओपन चॅलेंज ! काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे सरकारला मुंबईतील रस्ते आणि विकास कामावरून लक्ष्य केले आहे.मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाालिकेच्या रस्ते कामासाठी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून त्याचा परिणाम कामावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची असल्याचा प्रश्न ही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील रस्ते आणि विकास कामाचा आढावा घेऊन हस्तक्षेप करावा असे सांगून, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मुख्यंत्र्यांनी समोर समोर पत्रकार परिषद घ्यावी असे खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

मातोश्रीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्याच्या कामावरून एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.मुंबईमध्ये ४०० किमीचे रस्ते क्रॉंकेटचे काम सुरू केल्याचे केवळ सांगितले जात आहे. पण रस्त्याची आणि फुलांची काम ठप्प आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याजवळच्या ठेकेदार आणि बांधकाम व्यावसाईकांना फायदा करून देण्यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत का ? असा सवाल विचारण्यात आला आहे.मुंबई मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकेटीकरणावरून आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करताना काही प्रश्न उपस्थित केले. मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याचे कंत्राट काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेले नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. घोषणा करताना सीसीटीव्ही लावले जातील. काम कुठे पर्यंत पोहचले त्याची माहिती लोकांना कळवली जाईल पण त्याचा देखील पत्ता नसल्याचे ते म्हणाले.

Previous articleजुनी पेन्शनसाठी संप केलेल्या कर्मचा-यांना दिलासा ! सरकारने घेतला मोठा निर्णय
Next articleदिव्यांगांना खुशखबर : शिंदे सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय