मुंबई नगरी टीम
पुणे । मुंबईत भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जागेत होणार आहे असल्याचे सामंत म्हणाले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी निधी दिला जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जागेत होणार आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन एकर जागा देणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सांगितले असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण येत्या १४ फेब्रुवारी रोजी होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हा अनावरण सोहळा ऐतिहासिक असा होणार असल्याने नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे, अशा सूचना सामंत यांनी यावळी दिल्या.बैठकीनंतर सामंत यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराची पाहणी केली.