मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचा वाईनला पाठिंबा असल्याचा केलेला दावा धक्कादायक असून,त्या एका सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना लाभ होण्यासाठी त्यांनी असे विधान करू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचा वाईनला पाठिंबा असल्याचा केलेला दावा धक्कादायक आहे.त्या एका सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना लाभ होण्यासाठी त्यांनी असे विधान करू नये, असे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे बोलतात कमी बरळतात जास्त त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि लॉजिक याचा संबंध किती आहे हे त्यांच्या आजकालच्या बरळण्यावरून आपण पाहतोच.योग्य पद्धतीने विरोध करता आला नाही की घरच्यांवर उतरायचं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृतीच आहे.त्यामुळे चंदकांत पाटील यांनी हातात असलेला रिकाम्या वेळेचा वापर करावा आपल्या बुद्धीचा आवाका वाढवावा , जेणेकरून यापुढे बरळणे कमी होईल असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला.