देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन….काय म्हणाले फडणवीस ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असतानाच आज बेळगावातील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील सीमा भागातील काही गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगितला असतानाच जत तालुक्यातील काही गावात शेतीसाठी पाणी सोडण्याचे धाडस कर्नाटक सरकारने केल्याने महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र कर्नाटक सरकारने शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना कर्नाटकात येण्यापासून रोखल्याने अखेर या दोन मंत्र्यांना बेळगावचा दौरा रद्द करावा लागला असतानाच आज बेळगावातील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करीत आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.महाराष्ट्रातून येणा-या वाहनांना संरक्षण दिले जाईल,असेही त्यांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

Previous articleउद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान,महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व
Next articleएकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा राज्याचे लाडके लोकप्रिय “मुख्यमंत्री” असा उल्लेख