एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा राज्याचे लाडके लोकप्रिय “मुख्यमंत्री” असा उल्लेख

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चालवत असल्याची टाकी विरोधकांकडून करण्यात येत असतानाच आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चक्क राज्याचे लाडके,लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असा उल्लेख केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

गोरेगावमध्ये आज स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री आणि भाजपचे नेते उपस्थित होते.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे फडणवीस यांनी सरकार स्थापन केले मात्र राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चावलत असल्याचे सातत्याने टीका करीत आहेत.मात्र स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय देवेंद्र फडणवीसजी असा केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणाची सुरूवात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणी भाषेतून केली.मात्र,आपल्या पुढील भाषणात त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन….काय म्हणाले फडणवीस ?
Next articleशरद पवारांना ४८ तासात बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही