राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत.त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम असल्याचे राज्य सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, १० ऑगस्ट आणि .११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेले निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.मात्र तरीही ८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, ८ जानेवारी व ९ जानेवारी, ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अद्याप लागू आहेत.तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालने,सामाजिक अंतर पाळणे,हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिंबधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleसंघर्ष विसरू नका ! मिळालेली घरे विकून मुंबई बाहेर जाऊ नका
Next articleअनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का; मंत्री नवाब मलिकांना अटक