अनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का; मंत्री नवाब मलिकांना अटक

मुंबई नगरी टीम

मुंबई । १०० कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

१०० कोटी वसुली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या चार महिन्यापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ईडी ) कोठडीत असतानाच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या जमीन व्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.सुमारे ८ तास चाललेल्या चौकशी नंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर मलिक यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीला दुसरा धक्का बसला आहे. मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.त्यांनतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान ८ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालया बाहेर पडताना मलिक यांनी हात उंचावून ‘लढेंगे आणि जितेंगे,डरेंगे नही’ असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

Previous articleराज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम
Next articleनवाब मलिक जाहीरपणे बोलतात,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री होती