संजय राऊत तुरूंगात गेल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्राईव्हरने वाटले चक्क पेढे

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असतानाच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चालक राहिलेले आणि धुळे जिल्ह्यातील शिवसैनिक प्रकाश राजपुत यांनी संजय राऊत यांना अटक केल्याने चक्क पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे.राऊत यांच्या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ड्राईव्हर राहिलेले आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे शिवसैनिक प्रकाश राजपुत यांनी मात्र खासदार संजय राऊत यांना अटक केल्याने आनंद व्यक्त करीत चक्क पेढे वाटले आहेत.१९९३ ते २००० पर्यंत प्रकाश राजपुत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ड्राईव्हर होते.त्यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना पेढे दिले.संजय राऊत यांना अटक केल्याने मला आनंद झाला असून मी खूष आहे असे यावेळी राजपुत म्हणाले.राऊत यांनी शिवसेना संपली असून,त्यांनी चुकीचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.संजय राऊत तुरूंगात गेल्याने पेढे वाटले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ खुर्च्या असतात,उद्या ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक !
Next articleकाँग्रेसचे माजी मंत्री यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटीवर काय म्हणाले नाना पटोले ?