बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई शिंदे गटात ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई । खरी शिवसेना कुणाची यावर शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आले असतानाच शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत.त्यातच आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी कुटुंब वगैरे काही पाहिले नाही, एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे, असेही त्या या भेटीनंतर म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्या मध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे.आमदारांपाठोपाठ काही खासदारांनीही शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.त्याच्या या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई स्मिता ठाकरे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केल्यानंतर स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.मी एकनाथ शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखते.आज एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत.त्याचा आदर मी करते.त्यांचे कामही मला माहित असून, त्यांनी शिवसेनेत खूप काम केले आहे.शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी कुटुंब वगैरे काही पाहिले नाही, एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे, असेही त्या या भेटीनंतर म्हणाल्या.

कोण आहेत स्मिता ठाकरे ?
स्मिता ठाकरे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत.तसेच काही चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे.

Previous articleदेशासाठी त्याग व बलिदान केलेल्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून छळ
Next articleवीज दरात सवलत,भूमीहीन लाभार्थींना जागा,राजकीय,सामाजिक खटले मागे;मुख्यमंत्र्यांचा निर्णयांचा धडाका