काँग्रेसचे माजी मंत्री यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटीवर काय म्हणाले नाना पटोले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेस माजी मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर घेतलेली भेट तसेच भाजपे नेते मोहित कंबोज यांच्यासोबत एकाच वाहनाने केलेल्या प्रवासावरून काँग्रेस पक्षात खळबळ माजली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेले मच्छीमारांच्या संदर्भात घेतलेले निर्णय रद्द न करणे यासंदर्भात ती भेट होती तसेच या भेटीनंतर मोहित कंबोज यांच्या गाडीतून केलेला एकत्रित प्रवास हा केवळ योगायोग होता अशी सारवासारव पटोले यांनी केली आहे

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.अस्लम शेख हे मंत्री असताना त्यांनी मच्छीमारांसाठी काही चांगले निर्णय घेतले होते. ते निर्णय शिंदे सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे मच्छीमारांच्या हितासाठी अस्लम शेख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले,अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यावेळी त्यावेळी त्या ठिकाणी मोहित कंबोज होतेयत्या दिवशी कंबोज यांचा वाढदिवस होता.अस्लम शेख तिथे असताना तेंव्हा मोहित कंबोजदेखील तेथे आले होते.हा केवळ योगायोग होता तसेच ते शेजारीच राहत असल्याने एकाच गाडीतून गेले.त्यामुळे या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये, असेही पटोले म्हणाले.

Previous articleसंजय राऊत तुरूंगात गेल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्राईव्हरने वाटले चक्क पेढे
Next articleकाँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो तर एकही आमदार निवडून आला नसता