मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जनतेला मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्याने राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाय मास्क वापरण्यावर असणारे बंधने उठविण्यात येवून मास्क वापरणे ऐच्छिक करण्यात आले आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला गेल्या अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा विनामास्क फिरणे शक्य होणार आहे.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
राज्यात गेल्या अडीच वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. सध्या राज्यात असलेली कोरोनाची लाट ओसरली असल्याने राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात आता मास्क वापरणे बंधनकारक असणार नाही.मात्र गर्दीच्या ठिकाणी स्वत:ची काळजी घेण्यासाठी मास्क वापरावा असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केले.आजच्या या निर्णयामुळे राज्यातील पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येणार आहे.गुढीपाडव्याच्या दिवसापासून राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येणार असल्याने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि मिरवणूका आता मोठ्या उत्साहात काढा असेही आवाहन टोपे यांनी केले.राज्य निर्बंधमुक्त झाल्याने हॅाटेल,बस,रेल्वे,मॅाल्स आदी पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होणार आहे.डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यावर राज्यातील ठाकरे सरकारने राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे.मास्क वापरणे ऐच्छिक करण्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.आज मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात येणार आहे.