मुंबई नगरी टीम
मुंबई । विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागात विजेचे तात्पुरते भारनियमन करण्याचा निर्णय कालच उर्जा विभागाने घेतला असल्याने राज्य पुन्हा अंधारात जाण्याची शक्यता आहे.यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.सावध! ऐका पुढल्या हाका…टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त,भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे,असे ट्विट करून त्यांनी हल्लाबोल केला आहे.
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच.
वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे ❗️— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2022
भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.सावध! ऐका पुढल्या हाका… टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्समुळे जनता हैराण परिणाम दिसू लागले आहेत… अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे…असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले.यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच असे नमुद करीत,वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.