मुंबई नगरी टीम
औरंगाबाद । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शाहु,फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का घेत नाही अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात.यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे,महाराष्ट्र वाचला पाहिजे तसेच प्रबोधनकार समजले पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
औरंगाबाद येथे आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत मुप्टा या शिक्षक संघटनेचे रौप्यमहोत्सवी शिक्षक अधिवेशन पार पडले.त्यावेळी पवार यांनी मनसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समाचार घेतला.शिवरायांचे नाव हे तुमच्या माझ्या अंतकरणात असून, ते आगळे वेगळे राजे होऊन गेले.काही ठिकाणी मोगलांच,कुतुबशाहीचे राज्य होते,अशा परिस्थितीत अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले. अनेक राजे होवून गेले मात्र चारशे वर्षानंतरही लोकांच्या मनात शिवाजी महाराजांचे स्थान आहे. शिवाजी महाराजांनी जे राज्य केले ते भोसलेंचे राज्य नव्हते तर ते रयतेचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज होते असे सांगून,ज्यांनी इतिहास घडवले त्यांचे स्थान अंतकरणार आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही, अशा शब्दात पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.
शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य रयतेने राज्य होते म्हणून त्या राज्याची चर्चा आजही होते आहे.शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत पण फुले, शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात अशी टीका केली.यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे आणि प्रबोधनकार समजले पाहिजे असा टोलाही यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला.सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा असेल तर फुले यांचे विचार विसरून कसे चालेल,शाहू महाराज हे आगळे वेगळे राजे होते.त्यांना खोट्या गोष्टी त्यांना आवडत नव्हत्या.डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले असेही पवार यावेळी म्हणाले.