मुंबई नगरी टीम
मुंबई । महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याने भविष्यात मनसे आणि भाजपात युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युती संदर्भात आज मोठे वक्तव्य केले आहे.मनसे आणि भाजप यांच्यात कोणत्याही प्रकारच्या युतीच्या प्रस्ताव नाही. याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याने या संदर्भात आलेल्या बातम्या या अपरिपक्व असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.मनसेसोबत युतीच्या चर्चा कपोकल्पीत आहे. मनसेकडून युती संदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. पण एक मात्र नक्की आहे,अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत.त्यातील बहुतांशी भूमिकांना म्हणजे ती हिंदुत्वाची असो किंवा भोंग्याची, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते लावायला पाहिजे,या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही ज्या भूमिका मांडतो आहे.त्याच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत,पण अजूनही आमची कसलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता त्यावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या फारच अपरिपक्व असे आहेत,अशा शब्दांत फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळून लावल्या आहेत.सबका साथ सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास,हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. मोदी यांच्या योजना सर्वांना लागू आहेत, पण काही जण मतांच्या राजकारणासाठी अल्प संख्यांकाचे लांगुलचालन करतात त्यामुळे आज हिंदुस्थानात परिस्थिती बिघडते आहे,असे फडणवीस म्हणाले.