मोठा दिलासा : राज्यात सध्या तरी मास्क सक्ती नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीवर राज्य सरकारचे लक्ष आहे. पण सध्यातरी मास्क सक्तीचा निर्णय झालेला नाही असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह राज्य आणि देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचे सादरीकरणही होते.या बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोना परिस्थितीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे. तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही. मास्कचा वापर न केल्यास दंडही ठोठावण्यात येणार नाही. मात्र, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

Previous articleमहानगरपालिका,नगरपालिका,जिल्हापरिषदांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार
Next articleमनसे आणि भाजपची युती होणार की नाही ? देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा