प्रवासासाठी पुन्हा ई-पास बंधनकारक ; ‘या’ संकेतस्थळावर जा आणि मिळवा ई-पास

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला  आळा घालण्यासाठी येत्या १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यानुसार आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत प्रवासावर बंदी घातली आहे.मात्र आवश्यक कामासाठी प्रवास करावयाचा असल्यास राज्यात प्रवासासाठी पुन्हा एकदा सक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला आहे.यासोबतच प्रवासावरील निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक प्रवासासाठी राज्यात पुन्हा एकदा ई- पासची सक्ती करण्यात आली आहे.अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य,आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना प्रवासासाठी या ई पासची आवश्यकता असणार आहे.राज्य सरकारने वैद्यकीय कारण आणि अंत्यसंस्कार अशा अत्यावश्यक कारणांसाठी प्रवासाची मुभा दिली आहे.यासाठी ई-पास गरजेचा आहे. नागरिकांना महत्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज भासल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.निर्बंधाच्या काळात महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण भासल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

कसा काढायचा ई- पास ?

अत्यावश्यक प्रवासासाठी ई- पास मिळवण्यासाठी सर्वात अगोदर https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.त्यानंतर नंतर ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावे.त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा आणि आवश्यक असणारी कागदपत्र अपलोड करा.यामध्ये प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही नमूद करावे लागणार आहे.अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.संबंधित ई पासमध्ये तुमची सर्व माहिती,वाहन क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल. प्रवास करताना ई-पासची मुळ प्रत जवळ बाळगणे गरजेचे आहे.अंत्यविधी,वैद्यकीय कारण,विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी या कारणांसाठी ई-पास देण्यात येतो.अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.

Previous articleअनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
Next articleमोठा दिलासा : मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य मिळणार