मोठा दिलासा : मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे स्थिती चिंताजनक झाली आहे.तर काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणा-यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.सर्वसामान्यांची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार असून, या योजनेवर एकूण २६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

देशाच्या विविध भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत.तर काही राज्यातील कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.अशा परिस्थितीमध्ये गोरगरीबांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.देशातील गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने गेल्या वर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात येत होता यामुळे गेल्या लॉकडाऊन अनेकांना मोठा आधार मिळाला होता . देशात गेल्या वर्षीप्रमाणेच पुन्हा परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळला आहे.

Previous articleप्रवासासाठी पुन्हा ई-पास बंधनकारक ; ‘या’ संकेतस्थळावर जा आणि मिळवा ई-पास
Next article“या” कुटूंबांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार शिवाय २ हजाराचा किराणा माल मिळणार