मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली.हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे. सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.या निकालानंतर राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलीसांचे कौतुक केले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली.या निकालानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त करीत,महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यनिमित्ताने व्यक्त केली.