भर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंना कागदावर काय लिहून दिले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली आहे.तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णयांची माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन काढत एका कागदावर काहीतरी लिहून तो शिंदे मुख्यमंत्री यांना दिला.त्यामुळे फडणवीस यांनी नक्की या कागदावर काय लिहिले होते यांची चर्चा चांगलीच रंगली आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांना संबोधत असतानाच काही माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असणारा माईक आपल्याकडे खेचल्याने याची चर्चा रंगली होती.तशीच काहीशी घटना आज घडली.शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात सकाळी ११ वाजता झाली.या बैठकीनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकार परिषद सुरू होताच मुख्यमंत्री शिंदे निर्णयाची माहिती देत असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पेन काढत एका कागदावर काहीतरी लिहिले आणि तो कागद मुख्यमंत्र्यांकडे सरकवला.त्यामुळे या कागदावर फडणवीस यांनी नक्की काय लिहिले होते, याची चर्चा रंगली आहे.

Previous articleठाकरे सरकारने स्थगिती दिलेल्या फडणवीसांच्या निर्णयाला शिंदेंचा हिरवा झेंडा
Next article५० पैकी एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान