मुंबई नगरी टीम
मुंबई । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेवून सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी विस्तार रखडल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टाकेला सामोरे जावे लागले होते.त्यातच मंत्री नसल्याने जनतेचे कामे रखडू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी सचिवांना मंत्र्यांचे अर्धन्यायीक अधिकार दिल्याने विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्यात आले होते.मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ३९९ फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती समोर आली आहे.
विस्तार रखडल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विरोधकांच्या टाकेचा सामना करावा लागला होता.मात्र विस्ताराला मुहूर्त मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात येणारी टीका थांबली आहे.मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी सचिवांना अर्धन्यायीक अधिकार दिल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले आहे.मात्र गेल्या सव्वा महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विभागातील एकूण ३९९ फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत,गरजूंना मदत,कृषि विभाग,मंत्री मंडळासमोर अनावायचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा यात समावेश आहे.मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात आले आहेत.