मुंबई नगरी टीम
मुंबई । मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून एकाही महिला आमदारांना संधी दिली नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिंदेसरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी टिका त्यांनी केली आहे.
राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार @supriya_sule यांनी केली आहे. pic.twitter.com/x6rJbq2DKu
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट आणि भाजपकडून एकाही महिला आमदारांना संधी देण्यात आली नसल्याने भाजपमध्ये छुपी नाराजी आहे.तर याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.आज ४० दिवसानंतर शिंदेसरकारच्या १८ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे.स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असे ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रीमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.