उद्धव ठाकरे यांची नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का ? भाजपने डिवचले

मुंबई नगरी टीम

मुंबई । संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने युती करण्याची घोषणा केल्यानंतर या नव्या युतीवरून भाजपने निशाणा साधला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत.२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली.या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली.परंतु उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही; म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले.आता उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. ही नवी युती उद्धव ठाकरे सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का ? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही धडपड तर नाही ना ? त्यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का ? असे सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित करून वैफल्यग्रस्त झालेले उद्धव ठाकरे उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous articleशिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती ; आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढणार
Next articleभाजपने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही : शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल