शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती ; आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेतून ४० आमदार फुटल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने युती करण्याचा निर्णय घेतला आहे.यापुढे सर्व निवडणुका या एकत्र लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली.संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोक्षी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने संभाजी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी युतीची घोषणा केली. यापुढे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली.आगामी विधानसभा,लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी या नेत्यांनी दिली.गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी चांगले निर्णय घेत लोकहिताचे काम केले.आता लोकशाही धोक्यात आलेली असताना छोटे पक्ष,संघटना वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागेल असेही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी सांगितले.सध्या महाराष्ट्रात आणि देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. आपल्या विचारांचे लोक आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू असे सांगून उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

Previous articleमोठा निर्णय : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळांडूच्या बक्षिस रकमेत पाच पटीने वाढ
Next articleउद्धव ठाकरे यांची नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का ? भाजपने डिवचले