शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदार संघाची जबाबदारी जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्या या महिन्यात बारामतीचा दौरा करणार असून या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या मंगळवारी बारामतीचा दौरा करणार आहेत.यानिमित्ताने ते बारामती मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे.काही मंत्र्यांनी संबंधित लोकसभा मतदार संघांचा दौरा करून वातावरण निर्मिती केली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्या याच महिन्यात बारामतीचा दौरा करणार असल्याने या क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवारी बारामतीचा दौरा करणार आहेत.बावनकुळे सपूर्ण एक दिवस बारामती लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांतून संवाद साधून भाजपा संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.एक दिवसाच्या दौ-यात ते भाजप कार्यकर्त्यांशीसंवाद साधून विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. बारामतीत आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर भाजपा जिल्हा बैठकीत पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Previous articleउद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांच्या नावावर मतं मागितली आणि जिंकून आल्यावर विश्वासघात केला
Next article‘त्या’ कंत्राटी एसटी चालकांना शासकीय सेवेत घ्या;धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी