दसरा मेळाव्याला उत्साहात वाजत गाजत आणि गुलाल उधळत या ! उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला परवानगी दिली आहे.यानंतर मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची परवानगी राज्य सरकारची असल्याचे सुनावत न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल अशी आशा व्यक्त केला.तेजस्वी परंपरेला गालबोट न लावता दसरा मेळाव्याला उत्साहात वाजत गाजत आणि गुलाल उधळत या असे आवाहन त्यांनी शिवससैनिकांना केले.

मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेना परवानगी दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधत दसरा मेळाव्याला येताना उत्साहात या,वाजत गाजत या,गुलाल उधळत या आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लावू नका असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.बाकीचे काय करतील याची कल्पना नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.शिवसेनेत दोन गट पडले नाहीत तर शिवसेना एकच असून अजून फोफावली असल्याचे सांगत कोरोनाचा काळ वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा चुकलेला नाही.न्यायालयाने कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर टाकलेली आहे.याला सरकार जबाबदार राहणार आहे.सरकार आपली जबाबदारी पार पाडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून,सर्वोच्च न्यायालयातील निकाल हा लोकशाहीचे भाकीत ठरवणारा असेल असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान नाशिक येथील भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्यावेळी त्यांनी उपस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.तुमचा हा उत्साह,प्रेम आणि एकजूट अशीच कायम ठेवा.यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे.आपल्याला शिवरायांचा भगवा फडकवायचाच आहे. निवडून आल्यावर रुसवे फुगवे, होऊ देऊ नका. गटतट होऊ देऊ नका, असे सांगतानाच भगवा झेंडा हीच आपली उमेदवारी आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Previous articleवेदांता फॅाक्सकॅान गुजरातला गेल्याने शिवसेनेचे सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश आंदोलन’
Next articleआरोप केला राष्ट्रवादीने मात्र मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राने लक्ष्य केले उद्धव ठाकरेंना !