१०० रूपयांत दिवाळी रेशन देण्याऐवजी खात्यात ३ हजाराची दिवाळी भेट जमा करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ,साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी असून,सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.विशेषतः महागाई प्रचंड वाढलेली आहे, जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे अशा परिस्थीतीत ज्या चार वस्तू १०० रुपयात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या व अत्यंत तुटपुंज्या आहेत. राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी असे आपणास वाटत असेल तर अतिसंवेदनशील मुख्यमंत्री या नात्याने तीन हजार रुपये रेशनकार्डधारकांच्या थेट बँक खात्यात जमा करून सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करावी, असे म्हटले आहे.

Previous articleबीकेसीवरील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट
Next articleउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भांडणात भाजपला मजबूत होण्याची संधी