शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौ-यावर जाणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी हैराण झाला आहे. विरोधकांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात ओला दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे सांगितल्याने विरोधक आक्रमक झाला आहे.मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे .त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले असले तरी राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार असून,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत .

Previous articleआगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश : भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट
Next articleमोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट