मोठा निर्णय : आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार

मुंबई नगरी टीम
मुं

मुंबई । आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.

अधिनियमाच्या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.

Previous articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे १४ निर्णय ! स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोठा निर्णय
Next articleदुप्पटीने वाढ : आता स्वातंत्र्य सैनिकांना मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन