मुंबई नगरी टीम
नागपूर । विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून येथे सुरू झाले.विधानसभा सभागृाहात कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी खिश्यावर लावलेल्या कमळाच्या बिल्ल्यावर आक्षेप घेत नविन पायंडे पाडून नका असे सुनावले अजित पवार यांच्या हरकती नंतर मंत्री चव्हाण यांनी बिल्ला काढत आपल्या खिशात ठेवला.
विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दर्शनी भागावर लावलेल्या कमळाच्या बिल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला.अनेक वर्षे सदस्य म्हणून सभागृहात काम करीत आहे. अनेक जण वेगवेगळ्या पक्षातून निवडून येतात.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री हे राज्याचे असतात ते अमूक एका पक्षाचे चिन्ह लावून सभागृहात येत नाहीत.त्यामुळे नविन पायंडा पाडू नका अशी कानउघडनी पवार यांनी करताच मंत्री चव्हाण यांनी खिशाच्यावर लावलेला कमळाचा बिल्ला काढून आपल्या खिशात टाकला आणि पुढील वाद टळला.