दडपशाही खपवून घेवू नका ! …मुख्यमंत्री आता ठोस भूमिका घ्या ; अजित पवारांनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

नागपूर । महाराष्ट्रातील एका खासदारला बेळगावात बंदी घातल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.एक जिल्हाधिकारी खासदाराला बंदी कशी घालू शकतो.आपण दडपशाही खपवून घेवू नये असे सुनावत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली.

महाराष्ट्रातील एका खासदाराला बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी शहरात येण्यास बंदी घातल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली.सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असताना सीमा भागातील काही गावे कर्नाटक मध्ये जाण्याचे ठराव करीत आहेत.राज्याचे दोन मंत्री बेळगावात जाणार होते.पण वातावरण बिघडू नये म्हणून त्यांनी जाण्याचे टाळले. शहा यांच्या बैठकीत महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये ये-जा करण्यास परवानगी दिली असतानाही एका खासदाराला बेळगावात येण्यास जिल्हाधिकारी बंदी कशी घालू शकतात असा सवाल पवार यांनी उपस्थित करीत दडपशाही खपवून न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी पवार यांनी केली.तर पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची नोंद घेतल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा असून, पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करीत हा विषय गाभिर्याने घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एका अधिका-याला बेळगावात जाण्यापासून रोखणे योग्य नसून,यापूर्वी राज्यात आणि केंद्रात कोणाचे सरकार होते,कुणी आंदोलने केली हे सर्वांना माहित आहे असे सांगून गेल्या मुख्यमंत्र्यांनी या भागातील घर्मादाय निधी बंद केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगतानच शिवसेनेचे आमदारांनी सभागृहात गोंधळ केला.या प्रश्नी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मार खाल्ला तर आम्हाल तुरूगांत जावे लागले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून त्यावेळी बोलणारे कुठे होते असा टोला त्यांनी लगावला. गेल्या अडीच वर्षात सीमा भागातील योजना बंद करण्यात आल्या असल्याचे सांगतानाच यावर राजकारण न करता सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Previous articleमंत्री जेव्हा कमळाचा बिल्ला लावून सभागृहात येतात…अजितदादांनी घेतला आक्षेप
Next articleआणि देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या आमदाराला दिली मंत्रीपदाची ऑफर