मुंबई नगरी टीम
मुंबई । खासदार संजय राऊत ज्या दिवसापासून जेल मधून सुटले आहेत. त्यादिवसपासून वायफळ गप्पा मारण्याचे काम ते करत आहेत.त्यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याने माझ्या प्रभागामध्ये वेड्यांचे हॉस्पिटल आहे कदाचित तिथे त्यांना काही दिवसात आणावं लागेल असे सांगतानाच जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे एक मंदीर बनवावे आणि त्याच्या उद्घाटनाला अजित पवार,संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना बोलवावे असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला.
शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील असे भाष्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तर देत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.ज्या दिवसापासून जेल मधून सुटले आहेत त्यादिवसपासून वायफळ गप्पा मारण्याचे काम ते करत आहेत.त्यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याने माझ्या प्रभागामध्ये वेड्यांचे हॉस्पिटल आहे कदाचित तिथे त्यांना काही दिवसात आणावं लागेल असा टोला त्यांनी लगावला.राऊत यांनी नागपूरात बॅाम्ब फोडणार असे वक्तव्य केले होते पण त्यांचे वक्तव्य खोदा पहाड निकला संजय राऊत अशी परिस्थिती निघाली.अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यावरून ते राष्ट्रवादीचे विचार मांडत आहेत हे स्पष्ट होते.पवार यांच्या वक्तव्यानर उध्दव ठाकरे यांनी साधी प्रतिक्रियाही दिली नाही किंवा निषेधही केला नाही असेही म्हस्के यांनी सांगून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे अजित पवार यांच्या विधानाशी सहमत आहे का हे स्पष्ट कराव अशी मागणी त्यांनी केली.
संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचं नाही या वक्तव्यावर त्यांनी निषेध व्यक्त केला नाही त्यामुळे संजय राऊत आणि मंडळी राष्ट्रवादीची धुणीभांडी करतात ? असे म्हणायचे का अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कार होता त्याने संभाजी राजांचे अतोनात हाल करत त्यांची हत्या केली .छ.संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही आणि त्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली मग त्यांना धर्मवीर म्हणायचे नाही का ? असा सवाल करीत आव्हाडांनी औरंगजेबाचे एक मंदीर बनवावे आणि त्याच्या उद्घाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना बोलवावे असा टोलाही त्यांनी लगावला.