तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे आता जोमाने तयारीला लागा ! शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई । तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे.आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले होते. त्यांची शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल असा विश्वास व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश ; नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करणार
Next articleहे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करु शकतो…. नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा