राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

खोतकरांना मोठा दिलासा

दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदारकी रद्द केलेले शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल असून, सर्वोच्च न्यायालयाने अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे पुढील काही काळापर्यंत अर्जुन खोतकर यांचे मंत्रिपद शाबूत राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या निराणयामुळे खोतकर यांना काल झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत खोतकर यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे यांनी रद्द केले होते. खोतकर यांच्या निवडीस काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल आणि विजय चौधरी यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.

Previous articleसिंधुदुर्ग जालना लातूर अहमदनगर,पंढरपूर मध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार
Next articleशनिवारी आणि रविवारी जिल्हा सहकारी बँका व प्रमुख बॅका सुरू राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here