अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक सुरू

अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक सुरू

मुंबई : उद्या पासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू झाली आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या पासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू झाली आहे. या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण , अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, सपाचे आ. अबू आझमी आदी नेते उपस्थित आहेत.

फसलेली कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्यान होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषयावर बैठकीत चर्चा होवून या अधिवेशनात सरकारविरोधातील रणनितीवर अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी विरोधीपक्षांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

Previous articleराज्याचे नगरविकास खाते बिल्डरांसाठीच चालवले जात आहे का? 
Next articleमुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here