फेरीवाल्यांच्या वाढीव संख्येची चौकशी करणार

फेरीवाल्यांच्या वाढीव संख्येची चौकशी करणार

नगर विकास राज्य मंत्री रणजित पाटील यांची ग्वाही

मुंबई : फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून जी नोंदणी करण्यात आली त्यामध्ये फेरीवाल्यांची
संख्या वाढल्याचे दिसून आल्याने या वाढीव संख्येची चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

फेरिवाला विषयातील लक्षवेधी सूचना भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी
आज विधानसभेत मांडली होती. त्या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी दोन महत्वाच्या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेत फेरिवाल्यांची नोंदणी केली. या नोंदणीपुर्वी महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय वाॅर्डची “नो युवर वाॅर्ड” ही जी पुस्तक असते त्यामधे अधिकृत फेरिवाल्यांची संख्या नमूद आहे. त्यापेक्षा जास्त नोंदणी आता झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये काही अनधिकृत फेरिवाल्यांची नोंदणी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. जर नोंदणी योग्य झाली नाही तर धोरणाची अंमलबजावणी ही होऊ शकणार नाही. त्यामुळे या वाढीव संख्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. अॅड आशिष शेलार यांनी केली. तसेच महापालिका अधिका-यांनी फेरिवाला क्षेत्र ठरवताना ते अरुंद रस्ते, छोट्या फुटपाथ व निवासी क्षेत्रात फेरिवाला झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे याचीही चौकशी करण्याची मागणीही आमदार शेलार यांनी केली.
दरम्यान दोन्ही मागण्या राज्य मंत्री पाटील यांनी मान्य केल्या.

Previous articleधनंजय मुंडे पक्ष आणि जनता तुमच्या पाठीशी
Next article“न्यूज १८-लोकमत”च्या मालक, संपादक, वार्ताहराविरुद्ध हक्कभंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here