वीज कर्मचारी संघटनांचा संप मागे

वीज कर्मचारी संघटनांचा संप मागे
ऊर्जामंत्र्यांशी सकारत्मक चर्चा

मुंबई :  वीज मंडळातील कर्मचारी संघटनांशी आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची फ्रेंचाईझींच्या विषयावर सकारत्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर संघटनांनी २६ व २७ मार्च रोजी पुकारलेला संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.

वीज हानी १५ टक्केपर्यंत कशी आणणार याचा प्रस्ताव द्यावा तोपर्यंत फ्रेंचाईझींचा निर्णय पुढे ढकलू असे ऊर्जामंत्र्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले. आम्हाला वीज हानी कमी करण्याची संधी द्यावी. वीज हानी आम्ही कमी करून दाखवू असेही संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.या संदर्भात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा चर्चा करू तोपर्यंत प्रस्ताव तयार करा असे ऊर्जामंत्र्यांनी संघटनांना सांगितले. आज फ्रेंचाईझींच्या विषयावर ऊर्जामंत्र्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रदीर्घ चर्चा केली.

Previous articleकंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी सरकारने बोलावली बैठक
Next articleलाठीचार्ज प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here