एल्गार” मोर्चाला परवानगी मिळो किंवा न मिळो मोर्चा निघणारच !

“एल्गार” मोर्चाला परवानगी मिळो किंवा न मिळो मोर्चा निघणारच !

मुंबई : भारिप बहुजन महासंघाच्यावतीने काढण्यात येणा-या उद्याच्या एल्गार मोर्चाला परवानगी मिळो किंवा न मिळो हा मोर्चा निघणारच अशी भूमिका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. कोरेगाव भिमा घटनेला जबाबदार असणारे संभाजी भिडेंना जाणूनबुजून अटक केली जात नसल्याचा असाही आरोपही त्यांनी केला.

काहीही झाले तरीही उद्या सोमवारी निघणारा एल्गार मोर्चा निघणारच असे सांगत. राज्य सरकार सैतानाला पाठिशी घालून सावाला शिक्षा करते आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे या सैतानाला पकडा असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजी भिडे यांना अटक झाली नसल्याने हा लोकशाहीचा गळा दाबत असल्याचा प्रकार असून, ज्यांनी मारले ते सनातनी हिंदू आहेत. सरकार त्यांना पकडत नाही. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न होत आहे हे दुर्दैवी आहे असेल्याचे आंबेडकर म्हणाले.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या भारिप बहूजन महासंघाच्यावतीने मुंबईत काढल्या जाणा-या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परीक्षेचा काळ सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून परवानगी नाकारण्यात आली असली तरी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याचे समजते. भायखळा राणी बाग ते आझाद मैदान असा एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. तसेच विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते.

Previous articleइंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ लावणे झाले सोपे : हे ॲप डाऊनलोड करा !
Next articleमहिलांना स्वाभिमान मिळवून देणारी अस्मिता योजना महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here