युनोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार

युनोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युनोच्या जनरल असेम्बली हॉल मध्ये साजरी करण्यासाठी भारत सरकारने कोणताही विरोध केलेला नाही. याप्रकरणी युनो कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे अधिकृत  घोषणा युनो कार्यालयाने केली असल्याची  माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी आज दिली.

युनोमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी  परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी आठवले यांनी चर्चा करून माहिती घेतली तसेच  युनो कार्यलयाशी संपर्क साधून तेथील भारतीय  नोडल एजन्सीला भीमजयंती साजरी करण्यासाठी  निर्देश देण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर  युनो कार्यलयातून अधिकृतरीत्या  युनो कार्यालयाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये भीमजयंती साजरी करण्याची अधिकृत जाहीर करण्यात आले.

१४ एप्रिल ला जगभर भीमजयंती साजरी होते यंदाही त्याच उत्साहात जगभरासह युनोमध्येही  भीमजयंती साजरी होणारच असा  विश्वास  आठवले यांनी व्यक्त केला होता त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे  त्यांनी जाहीर केल्यानंतर  आज युनो मध्ये  भीमजयंती साजरी होणार असल्याची अधिकृत  घोषणा करण्यात आली आहे.

युनो कार्यालयातील आंबेडकर राईट कार्यकर्ते  दिलीप म्हस्के  माझ्या परिचयाचे आहेत. युनो मध्ये जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देऊ नये असे पत्र तेथील मिशन इंडिया या भारतीय नोडल एजन्सी ने  दिले असल्याचा आरोप  काँग्रेस ने केला होता. काँग्रेस पक्षाचे दलितप्रेम हे बेगडी आहे.  काँग्रेसने याप्रकरणी  खोटे आरोप करून राजकारण करण्याचा  केविलवाणा प्रयत्न केला आहे.  जेंव्हा जेंव्हा महामानव डॉ बाबासाहेब  आंबेडकरांचा गौरव करण्याची वेळ आली तेंव्हा काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर अन्यायच केला होता अशी टीका आठवले यांनी केली आहे . केवळ राजकीय फायद्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन मागासवर्गीयांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करून हीन राजकारण खेळण्याचा प्रयत्न नेहमीच काँग्रेस केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नेहमीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे. मोदींच्या नेतृत्वातील एन डी ए सरकार हे युनो मध्ये भीमजयंती साजरी करण्यास विरोध करूच शकत नाही.युनो कार्यालयाने भीमजयंती साजरी करीत असल्याचा खुलासा केल्याने  काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे असे  म्हणाले.

अमेरिकेतील विविध शहरांत आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी येत्या १५ एप्रिल रोजी आपण स्वतः अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आठवले यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Previous articleबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तत्कालीन म्हाडाच्या अभियंत्यासह कुटुंबियांवर गुन्हा दाखल
Next article“महामित्र” अ‍ॅपवरील सर्व माहिती सुरक्षित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here