भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे मुंबईत जोरदार स्वागत

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे मुंबईत जोरदार स्वागत

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या उद्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचे आज संध्याकाळी मुंबईत आगमन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शाह यांचे विमानतळावर स्वागत केले. शाह यांच्या आगमनानंतर सुमारे ४०० मोटरसायकलस्वारांनी रॅली काढून त्यांना विमानतळापासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सोफीटेल हॉटेलपर्यंत नेले. या हॉटेलमध्ये रात्री उशिरा शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार व विनोद तावडे यांचा या बैठकीत समावेश होता. या बैठकीत पक्षाची महाराष्ट्रातील सद्यस्थिती, सरकारच्या कामाचा आढावा, केंद्र सरकारच्या निर्णयाची झालेली अंमलबजावणी, पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीने केली जाणारी तयारी, शिवसेना व नारायण राणे यांच्या पक्षाबद्दल घ्यावयाची भूमिका, यावर चर्चा झाल्याचे कळते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नेमणुका याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे आणु पक्षाध्यक्ष शाह यांच्यातच स्वतंत्र चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि शाह यांच्यातही काही काळ एकांतात चर्चा झाल्याचे समजते.

Previous articleराष्ट्रवादीला धक्का ; मांडव्याच्या सरपंच भाजपात
Next article….. अन इस्लामपूरचे मैदान मोबाईल बॅटरीच्या उजेडाने उजळून निघाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here