बाहेर आल्यानंतर भुजबळ खाजगी रूग्णालयात उपचार घेणार !

बाहेर आल्यानंतर भुजबळ खाजगी रूग्णालयात उपचार घेणार !

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी स्वादूपिंडाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जामीनाची प्रक्रिया संपवून कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर भुजबळ हे मुंबईतील खाजगी रूग्णालयातल उपचार घेणार असून,काही दिवस कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छगन भुजबळ यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्यामुळे सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भुजबळ हे उद्या शनिवारी किंवा सोमवारी कारागृहाबाहेर येतील.मात्र बाहेर येताच भुजबळ हे उपचारासाठी मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात ऊपचारासाठी दाखल होणार आहेत.उपचारानंतर काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी न लावता ते विश्रांती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अखेर  छगन भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने न्यायालयाने न्याय दिला आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे हा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. त्यांच्या सुटकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा उभारी मिळणार आहे. न्यायदैवतेवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. लवकरच या संपूर्ण षडयंत्रातून ते निर्दोष असल्याचे सिद्ध होईल असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भुजबळ यांचे पुत्र आ.पंकज भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleभाजपने स्वतःच्या फायद्यासाठी भुजबळांना तुरूंगातुन बाहेर काढले 
Next articleबालाजी खतगावकर मिरा भाईंदरचे नवे आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here