बालाजी खतगावकर मिरा भाईंदरचे नवे आयुक्त

बालाजी खतगावकर मिरा भाईंदरचे नवे आयुक्त

मुंबई : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त बी.जी.पवार यांची नियुक्ती जालनाचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आल्यानंतर मिरा भाईंदरचे आयुक्त म्हणून बालाजी खतगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बालाजी खतगावकर हे पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते.राज्य सरकारने तब्बल २७ सनदी अधिका-यांच्या बदल्या करताना मिरा भाईंदरचे आयुक्त बी.जी.पवार यांची नियुक्ती जालनाचे जिल्हाधिकारी म्हणून केली होती.त्यांच्या जागी बालाजी खतगावकर यांची मिरा भाईंदरचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आज त्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत.

Previous articleबाहेर आल्यानंतर भुजबळ खाजगी रूग्णालयात उपचार घेणार !
Next articleछगन भुजबळ  सोमवारपासून पुन्हा सक्रीय होतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here