शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही : उध्दव ठाकरे  

मुंबई नगरी टीम

मुंबई: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी  निशाणा साधला आहे. शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात  काळा पैसा राम मंदिर आदी मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यांनी  राम मंदिराच्या मुद्द्याचाही जुमला करुन टाकला, अशी टीका केली.  लातूरमध्ये झालेल्या भाजपा मेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला इशारा देत, मित्र पक्ष सोबत आला तर ठिक, अन्यथा मित्रपक्षालाही पराभूत करु, असा इशारा देत त्यांनी पटक देंगे असे वक्तव्य केले होते. शहा यांच्या या वक्तव्याचा समाचार  उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात घेतला. शिवसेनेला पटकणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला ठाकरे यांनी शहांना लगावला.
राम मंदिराचा मुद्दादेखील जुमलाच आहे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित करीत प्रत्येकात्या खात्यात १५ लाख जमा होतील हा जुमला होता. मग राम मंदिराचा मुद्दा हादेखील जुमला समजायचा का असा सवाल केला.राम मंदिराच्या उभारणीत काँग्रेस अडथळे निर्माण करते असे ते म्हणतात त्यामुळे देशाने   त्यांना सत्तेतून खाली खेचून तुम्हाला बहुमत दिले. परंतु तुम्ही मंदिर उभारल्याचे आम्हाला तरी दिसत नाही,’ अशी टीका उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केली.

Previous article१० टक्के आरक्षण टिकेल असे मला वाटत नाही : पवार
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था गजनी मधल्या आमीर खान सारखी : मुंडे