१० टक्के आरक्षण टिकेल असे मला वाटत नाही : पवार

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त आदींना दिलेले आरक्षण टिकेल. त्याला कोणताच धक्का लागणार नाही.परंतु सवर्णांना दिलेले आरक्षण घटनात्मकरित्या टिकेल असे मला वाटत नाही, अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. कॅांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी भेट झाली असून जागा वाटपा संदर्भात चर्चा झाल्याचेही पवार यांनी आद कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

 द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर, ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटापैकी कोणता  चित्रपट पाहणार? यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, राजकारणात नेहमीच सिनेमे पाहावे लागतात आणि दिसत असतात. भूमिका बदलत असतात. ठाकरे यांच्या आयुष्यावर असणारा  चित्रपट पाहणार असल्याचे पवार म्हणाले.या  चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी मला निमंत्रण दिले  आहे  असे पवारांनी सांगितले

Previous articleघोटाळ्याचे पुरावे खोटे निघाले तर मला फाशी दया : मुंडे
Next articleशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही : उध्दव ठाकरे