शरद पवारांना टक्कर देण्यासाठी धनगर आरक्षणाच्या हालचाली ?

शरद पवारांना टक्कर देण्यासाठी धनगर आरक्षणाच्या हालचाली ?

मुंबई नगरी टीम

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडणुक लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पवारांशी माढ्यातुन दोन हात करण्यासाठी रासपचे अध्यक्ष तथा मंत्री  महादेव जानकर सज्ज झाल्याचे सांगण्यात येते.लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्यावर होत असली तरीही माढ्यात मात्र धनगर आरक्षण हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. पवारांना टक्कर देण्यासाठी सरकारने धनगर आरक्षणाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.आरक्षणाच्या मुद्यावर माढ्यातील विजयाचे समीकरण ठरणार आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाला मुळात माढा येथून सुरूवात झाली होती. २०१४ मध्ये भाजप धनगर आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आला. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा निर्णय होईल,असे आश्वासन देण्यात आले होते.नंतर काही झाले नाही. यामुळे धनगर समाज संतप्त असून,याचा फायदा शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता अचूक उठवणार याची कल्पना युतीला आली आहे.धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केलेली चालढकल भाजप आणि शिवसेना यांना चांगलीच महाग पडणार याचा अंदाज आल्यानेच आता ऐनवेळेस धनगर आरक्षणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.मात्र माढ्यात जिंकण्यासाठी शिवसेना नेत्यांनी धनगर समाजातील नेत्यांची बैठक बोलवली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्याशी चर्चेसाठी बोलवण्यात येणार आहे. हा सारा खटाटोप ऐनवेळेस पवारांच्या उमेदवारीमुळे घाबरून केला जात आहे,असा आरोप विरोधकांनी केला आहे.

 

Previous articleमोदी सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही
Next articleआघाडीत मनसेला “नो एंट्री”