महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रीय : जितेंद्र आव्हाड
मुंबई नगरी टीम
मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी न सोडल्याने त्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला.यावर राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावताना लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,असे म्हटले आहे. महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली असून सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी,असे ट्विट आव्हाडांनी केले आहे.
अनेक दिवसांपासून नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान तिढा निर्माण झाला होता. सुजय विखे पाटील यांना यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची होती.त्यांनी नगरच्या जागेची मागणी केली होती.मात्र राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर सुजय विखे पाटील यांनी आज काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला.यामुळे नगरमध्ये भाजप आणखी मजबूत झाला आहे.महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देऊन सत्तेवर आणले.आता विखे पाटील गटासारखा मातब्बर गट भाजपच्या गोटात गेला आहे.