राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आता खुद्द राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

सुजय भाजपमध्ये गेला आहे.आता राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेत यावे आणि युती मजबूत करावी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेत होते आणि दोघांना शिवसेनेने मंत्रीपदही दिले होते. त्यानंतर आता त्यांची तिसरी पिढीही युतीसोबत जात असल्याने ही चांगली गोष्ट असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.मात्र राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावायला राऊत विसरले नाहीत. शिवसेना-भाजप युती सोडताना त्यांनी जे वक्तव्य केले होते ते त्यांनी आता तपासायला हवे,असे राऊत म्हणाले. जे आपले घर सांभाळू शकत नाहीत,त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी भान ठेवायला हवे होते.भविष्यात काय वाढून ठेवले आहे,ते त्यांनी पहायला हवे होते, असे ते म्हणाले. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यां दोघांनीही युतीच्या मागील सरकारमध्ये मंत्रिपद भोगले आहे.

 

Previous articleविरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही
Next article…अन्यथा राजू शेट्टी १५ जागी उमेदवार उभे करणार