मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत असतानाच विखे पिता पुत्रानी घेतली अमित शहा आणि जे.पी नड्डा यांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहचले असतानाच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे खासदार पुत्र डॅा. सुजेय विखे पाटील यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. मुद्द्यावरुन दिल्लीत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत.मात्र या बैठकीपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे खासदार पुत्र डॅा. सुजेय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विखे पिता पुत्रांनी शहा यांची भेट घेतल्यानंतर या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच विखे पिता पुत्रांची ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट झाले.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासदार पुत्र डॅा. सुजेय विखे पाटील यांनी या भेटीची माहिती समाजमाध्यातून दिली आहे.दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.तसेच भविष्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात देखील याचपद्धतीने निर्भेळ यश मिळवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप लढत राहील याबाबत त्यांना आश्वासित केले अशी माहिती त्यांनी दिली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट यांची भेट गेतल्यानंतर विखे पिता पुत्रानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.

Previous articleठाकरे सरकारने बंद केलेली योजना शिंदे फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार
Next articleमंत्री चंद्रकांत पाटीलांवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा ; भारतीय बौद्ध महासभेची मागणी