विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही

विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून मी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही, असे सांगून, पक्ष जी  जबाबदारी देईल ती मी पार पाडेन, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.माझी भूमिका मी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगितली आहे. सुजयने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून लगेच विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही असे सांगून, पक्ष सांगेल ती जबाबदारी  पार पाडणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.सुजयला काँग्रेसकडून अहमदनगरची उमेदवारी हवी होती परंतु राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याची त्यांची मानसिकता नव्हती. म्हणून नाइलाजास्तव हा निर्णय त्यांनी घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

 

 

Previous articleलोकसभा निवडणूकीसाठी राज्यात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार
Next articleराधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे