रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांमध्ये दिलजमाई

रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांमध्ये दिलजमाई

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी उभा दावा असणारे शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी आपले बंडाचे निशाण आज खाली ठेवले. त्यांच्या माघारीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या दृष्टीने मोठा पेच सुटला आहे.यामुळे भाजपकडून रावसाहेब दानवे लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 युतीच्या औरंगाबादमधील मेळाव्याआधी मुख्यमंत्री फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खोतकर आणि दानवे यांच्यात  बैठक झाली. या बैठकीत खोतकरांचे मन वळवण्यात फडणवीस  आणि ठाकरे यांना यश आले.खोतकरांनी नंतर सांगितले की,मुख्यमंत्री आणि ठाकरेंनी युतीचा धर्म समजून सांगितला. या धर्माप्रमाणे पहिली परीक्षा मी पास होईन.आमच्या जिल्ह्यात आणीबाणी लागली होती, ती आज उठली.

उद्धव ठाकरेंच्या निर्णयाच्या विरोधात मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही. जी जबाबदारी टाकली आहे, ती पार पाडू, असे आश्वासनही खोतकरांनी दिले आहे. मात्र त्यांनी ते पाळले की नाही ते निवडणूक निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे.मार्केट कमिटीमधील गाळे विक्री करताना खोतकर यांनी घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण  दानवे यांनी लावून धरले होते. हे प्रकरण मिटवण्यात यावे ही खोतकरांची मागणी होती.ती मान्य केल्यानेच खोतकरांनी माघार घेतली,असे समजते .खोतकर यांच्यावर तूर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले . या प्रकरणात अर्जुन खोतकर यांच्या ४५ नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत. ते सगळे जामिनावर आहेत. हे प्रकरण मिटवण्यात यावे,अशी ही त्यांची मागणी होती. ती कदाचित मान्य करण्यात आली असावी. रामनगर येथील कारखाना खोतकर आणि औरंगाबादमधील एक बांधकाम व्यावसायिक यांनी विकत घेतला आहे. यात घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात मदत करावी आणि प्रकरण मिटवावे,ही मागणी होती.तसेच विधानसभेसाठी खोतकरांना दानवे मदत करतील,असेही ठरले असल्याची चर्चा आहे.

 

Previous articleराज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र
Next articleमाझ्या वक्तव्याचा विपर्यास : शरद पवार